Lek Ladki Yojana Registration

Lek Ladki Yojana registration- लेक लाडकी योजना अर्ज करण्याची पद्धत

lek ladki yojana registration

महाराष्ट्र राज्यातील लेकींच्या कल्याणासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा पुढे चालवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यात लेक लाडकी योजना Lek Ladki Yojana Registration चालू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. दिल्लीतील मोदी सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या धर्तीवर राज्यात देखील मुलींच्या कल्याणासाठी एक योजना असावी या विचारातून राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने लेक लाडकी योजने ची घोषणा केली आहे. राज्यातील मुलींचे बाल मृत्यूदर कमी व्हावेत आणि महाराष्ट्र राज्यात मुलींचे प्रमाण वाढून त्यांच्या शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी यासाठीची हि योजना असल्याचे  बोलले जात आहे. महाराष्ट्र सरकारने  अभ्यासानिशी बनविलेल्या या योजने मुले राज्याला मुलींच्या संदर्भात खूप लाभ होईल असा विश्वास मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनीं बोलून दाखविला आहे.

 राज्यातील मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खासकरून हि योजना असेल. या नव्याने जरी करण्यात आलेल्या लेक लाडकी योजने खाली महाराष्टातील १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलीला एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी किती मुली दरवर्षी पात्र होतील याबद्दलची माहिती गोळा करण्याचे काम चालू असल्याचे शासन स्तरावरून सांगण्यात येत आहे. लेक लाडकी योजना चालू करण्यासाठी १ एप्रिल २०२३ हि कट ऑफ डेट (तारीख) ठेवण्यात आली आहे (lek ladki yojana registration from April 1, 2023) . म्हणजेच १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल असे सरकारने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

 तसेच या योजने अंतर्गत एका कुटुंबातील किंवा एका लाभार्थी पालकांच्या जास्तीत जास्तीत दोन मुलींना या योजने अंतर्गत आर्थिक लाभ म्हणजेच एक लाख एक हजार रुपये मिळतील. महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लेक लाडकी योजने साठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे (lek ladki yojana registration started). या योजनेसाठी लागणाऱ्या वार्षिक निधीची मागणी महिला व बालविकास विभागातर्फे महाराष्ट्र शासनाकडे सध्या नागपूर येथे चालू असलेल्या ( ११. १२. २०२३ ) हिवाळी अधिवेशनात केली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती तटकरे यांनी दिली.

 इथे वाचा कि लेक लाडकी योजने अंतर्गत तुम्हाला किती रक्कम मिळणार 

या योजने साठी लागणारा निधी वार्षिक तत्वावर शासनाकडे मागितल्या जाईल असाही त्या म्हणाल्या. सध्याच्या २०२३-२४ च्या निधी ची मागणी शासनाकडे गेली आहे. जसा निधी मंजूर होईल तसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये द्वारे लाभ पोहचवला जाईल. या लेखामध्ये आपण लेक लाडकी योजने ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागतपत्रे इत्यादी विषायी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या योजने अंतर्गत किती कुटुंब लाभार्थी होतील या विषयीची निश्चित माहिती सध्यातरी उपलब्ध नाही. पण दर आर्थिक वर्षाकाठी या योजनेचा डेटा  गोळा करून जाहीर करण्यात येईल असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. तसेच या योजनेमुळे महाराष्ट्र सरकारवर, राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी जवळ जवळ दोन हजार कोटींचा आर्थिक बोजा पडणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. हा आर्थिक ताण सहन करून राज्यात लेक लाडकी योजना चालवण्याचे राज्यसरकारने जाहीर केले आहे. केंद्रातील सरकारची या योजनेसाठी प्रत्यक्ष अशी काही मदत नसेल. या योजने साठी पात्रता सरकारने ऑक्टोबर २०२३ lek ladki yojana registration- महहला व बाल हवकास हवभाग, शासन हनणणय क्र. एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6, हदनाांक 30 ऑक्टोबर,2023 मध्ये काढलेल्या परिपत्रकामधे जाहीर केलेली आहे. नक्की या मुलींच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजनेची पात्रता काय असेल आपण पुढे जाणून घेऊया. 

महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजने अंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते ती अठरा वर्षाची होई पर्यंत एकूण १०१०००- एक लाख एक हजाराची मदत दिली जाणार आहे. पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबासाठी हि योजना असणार आहे.

lek ladki yojana registration

लेक लाडकी योजना पात्रता

  1. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे
  2. लाभार्थ्यांचे बँक खाते हे महाराष्ट्र राज्यात असले पाहिजे
  3. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे ( तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक)
  4. त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक
लेक लाडकी योजनेचा लाभ सर्व लाभार्थी कुटूंबा पर्यंत पोचावा यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजने ची अर्ज प्रक्रिया जास्त कठीण व किचकट न ठेवता (lek ladki yojana registration) ती सुटसुटीत व सोपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलीही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नसून आपल्याला एका कागदावर उपलब्ध असलेला अर्ज आपल्या जवळच्या अंगणवाडीत भरून द्यायचा आहे. जर या योजने साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवली गेली असती तर महाराष्ट्रातील कित्येक गाव खेडी त्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ठरवल्याप्रमाणे या योजनेसाठी सिंगल विंडो सिस्टिम प्रमाणे अर्ज सादर करावा लागेल. जे अंगणवाडी केंद्र गाव खेड्यापासून ते अगदी शहरापर्यंत उपलब्ध आहे अश्या अंगणवाडी केंद्रामार्फत हि योजना घरो घरी पोहचवण्याची तयारी शासनाने केली आहे. 
 

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

लेक लाडकी योजने साठी तुम्हाला तुमच्या मुलीची नोंदणी करण्यासाठी प्रथम तिच्या जन्माचा दाखला, तुमचे आधार कार्ड, बँक खाते, आणि खाली दिलेल्या इतर आवश्यक त्या कागतपत्रांसह आपल्या जवळच्या आशा किंवा अंगणवाडी केंद यांच्याशी संपर्क साधून आपला संपूर्ण भरलेल्या अर्ज द्यावा लागेल. 

लेक लाडकी योजने साठी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेजवळ आवश्यक त्या कागतपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल.

(Lek Ladki Yojana Registration)

(इथे क्लीक करा)

लेक लाडकी योजने चा लाभ घेण्यासाठी कागतपत्र देखील कसे कमीत कमी आणि फक्त आवश्यक असणारे कागपत्र घेऊनच लाभ देता येईल हि दक्षता राज्य शासनाने घेतली आहे. आपल्या कडे सहज उपलब्ध असणारे आणि जे डोकमेंट्स आपण सगळीकडे देतो असे आधार कार्ड, बँक पासबुक असे डोकमेंट्स आपल्याला जमा करावे लागतील. पुढे जाणून घेऊया कि नक्की कोणते कागतपत्र आपल्याला या योजनेसाठी लागतील

लेक लाडकी योजना आवश्यक कागतपत्रे

  1. लाभार्थी कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड (शिधापत्रिका)
  2. पालकाचे आधार कार्ड
    लाभार्थी मुलीचे आधारकार्ड (प्रथम लाभावेळी हि अट शिथिल राहील)
  3. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला  १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला (ओरिजिनल)
  4. बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  5. आपले बँक खाते आधार सोबत संलग्न असावे 
  6. संबंधित  टप्प्यावरील लाभाकरता शक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafide Certificate)
    शाळेचा दाखला
  7. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  8. मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिचे मतदार ओळख प्रमाणपत्र (मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा) 
  9. अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याचे मुलीचे स्वयंघोषणापत्र 

लेक लाडकी योजने चाअर्ज कुठे मिळेल ?

लेक लाडकी योजनेसाठी कुठलीही किचकट ऑनलाईन अर्ज प्रक्रिया न राबवता महाराष्ट्र शासनाने अत्यंत सोपी आणि साधी अर्ज पद्धत अवलंबलेली आहे. जे अशा केंद्र जे अंगणवाडी केंद्र गावागावात आहे. अश्याच अंगणवाडी केंद्रा मार्फत आपल्याला अर्ज करायचा आहे. Lek Ladki Yojana Registration through Anganwadi kendra)
लेक लाडकी योजने साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असल्याने आपल्याला हा अर्ज वेबसाईट वरून डाउनलोड करायचा आहे. तुम्ही खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून हा अर्ज pdf स्वरूपात डाउनलोड करू शकता. अर्ज डाउनलोड केल्यावर आपल्याला संपूर्णपणे भरलेला अर्ज अंगणवाडी सेविकेकडे सुपूर्द करायचा आहे. 
(lek ladki yojana registration)

तुम्ही आमच्या वेबसाईट वरून यासाठी अर्ज डाउनलोड करू शकता
खाली दिलेल्या लिंक वरून फॉर्म डाउनलोड करून आवश्यक त्या कागतपत्रांसहित आंगनवाड़ी सेविकेकडे सादर करा
लिंक खाली दिलेली आहेसंबंधित  

lek ladki yojana registration

लेक लाडकी योजना पैसे कधी आणि किती मिळणार?

राज्य सरकारने राबविणार असणाऱ्या या योजने अंतर्गत तुमच्या मुलीला म्हणजे, लाभार्थी पात्रता पूर्ण करणाऱ्या प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे तुम्हाला एकदाच न मिळता ते टप्प्या टप्प्याने दिले जाणार आहे. मुलींच्या जन्मापासून म्हणजे मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये ते ती अठरा वर्षाची झाल्यावर ७५०००/- पंचाहत्तर हजार रुपये मिळणार आहेत. या योजने साठी नोंद झालेल्या लाभार्थ्यांना एकदा का संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली कि पहिला टप्पा dbt म्हणजेच आधार द्वारे दत्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात येईल. यासाठी लागणारा निधी महिला व बिलविकास विभागाने महाराष्ट्र सरकारकडे मागितला आहे. तो निधी येताच आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण होताच लेक लाडकी योजने च्या प्रत्यक्ष लाभला सुरुवात होईल असे शासनातर्फे कळविण्यात आलेले आहे.

Table of Contents

Scroll to Top