लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना असं या योजने च नाव असून राज्यातील मुलींच्या कल्याणासाठी हि योजना असून केंद्रातील मोदीजींच्या मार्गदर्शनानुसार आपण ती चालू करत असल्याचे देखील यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपल्या महाराष्ट्र राज्यात सत्ताबदलानंतर प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प यावर्षी (मार्च २०२३ ) मध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तो अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्रातील सत्ता बदल नाट्यानंतर भाजपा प्रणित सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी आणि त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये विविध लोकाभिमुख योजनांच्या, प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या. राज्यातील विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडी ने अर्थातच या अर्थसंकल्पाला राज्यातील जनतेसाठी जास्त काही नसलेला प्रकल्प म्हटलं. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष आणि भाजपा ने या अर्थसंकल्पाची तोंडभरून प्रशंसा केली. याच अर्थसंकल्पामधे मुलींसाठी खास असलेल्या एका योजनेची घोषणा करण्यात आली. याच लेक लाडकी योजना या विषयी अधिक माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, तसेच या लेखामध्ये या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कोणकोणती डोकमेंट्स यासाठी लागतील? या योजनेसाठी पात्र कोण कोण असेल याविषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे..

लेक लाडकी योजना काय आहे?

या योजने अंतर्गत महाराष्ट्रात जन्म झालेल्या मुलींसाठी एकूण एक लाख एक हजार रुपयाचे अर्थ साहाय्य दिले जाणार आहे.
 महाराष्ट्रातील पिवळ्या तसेच केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्म घेणाऱ्या मुली या योनजेसाठी पात्र असतील.

या योजनेद्वारे राज्यातील मुलींना शिक्षण घेताना कोणतीही बाधा येणार नाही तसेच त्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल या उद्देशाने हि योजना चालू करत कसल्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. 

१० ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याआधी मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्राचा अर्थ संकल्प विधानसभेमध्ये सादर करत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजना राज्यात राबवली जाईल अशी घोषणा केली होती. त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरदूत हि महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात येणारआहे. तसेच येणाऱ्या नवीन वर्ष पासून या योजनेच्या प्रत्यक्ष लाभला सुरुवात होईल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

लेक लाडकी योजने चा उद्देश काय आहे?

महाराष्ट्रातील मुलींचा जन्म दर वाढावा , मुलींची गर्भातच असताना होणारी हत्या थांबवणे. महाराष्ट्रात अल्प वयात मुलींचे होणारे लग्न किंवा बालविवाह रोखणे. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावून त्यांना स्वयंपूर्ण बनवून त्यांची शैक्षणिक प्रगती साधने हा या योजने चा मूळ उद्धेश आहे. या योजने मुळे महाराष्ट्रातील स्त्रीभ्रूण हत्या थांबतील तसेच बालविवाहास प्रतिबंध बसेल अशी सरकारला आशा आहे. ज्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे तसेच ज्यांना ज्यांना मुलींचे उच्च शिक्षण परवडनारे नाही अश्या गरीब कुटुंबातील मुलींसाठी हि योजना संजीवनी ठरेल असे अभ्यासकांनी नमूद केले आहे. लेक लाडकी योजना हि टार्गेटेड योजना किंवा स्कीम असल्यामुळे संबंधित घटकाला या योजनेचा लाभ मिळतोय कि नाही याकडे सरकारचे लक्ष असेल. 

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना पात्रता

लाभार्थी मुलीचे पालक महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे
संबंधित कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड (शिधापत्रिका) असले पाहिजे

लाभार्थ्यांचे बँक खाते हे महाराष्ट्र राज्यात असणे बंधनकारक आहे.

 एका  कुटुंबात जन्म झालेल्या एका किंवा जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. 

हा लाभ फक्त १ एप्रिल २०२३ नांतर जन्म झालेल्या मुलींनाच दिला जाईल. 

या तारखेपूर्वी जन्म झालेल्या मुली या योजनेसाठी पात्र नसतील. 

लेक लाडकी योजना आवश्यक कागतपत्रे

  1. पिवळे किंवा केशरी राशन कार्ड (शिधापत्रिका) 
  2. पालकांचे (आई किंवा वडील) महाराष्ट्रातील पत्त्यासह आधार कार्ड, 
  3.  लाभार्थी मुलीचे आधार कार्ड 
  4. चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखल आणि त्यावरील दाखवलेले उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे
  5. मुलीचा जन्माचा दाखल 
  6. लाभार्थी मुलगी शाळेत शिकत असल्यास त्या वेळच्या लाभासाठी शाळेचे प्रमाणपत्र Bonafide Certificate.
  7. बँकचे पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स.
  8. मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिचे मतदान ओळखपत्र- मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा.
  9. दुसऱ्या मुलीच्या लाभावेळी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र.
लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

लेक लाडकी योजने साठी अर्जाची पद्धत महाराष्ट्र सरकारने आता जाहीर केले आहे.  या योजने साठी अर्ज आपल्याला ऑफलाईन भरावा लागेल याची निश्चित माहिती आता महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध झालेली आहे . महाराष्ट्र सरकारचे महिला व बालविकास विभाग या प्रक्रियेवर काम करत आहे. अर्ज नेमका कुठे करायचा याची इतंभूत माहिती आम्ही तुमच्या इथे देत आहोत. हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविका किंवा आशा यांच्याकडे भरून द्यावा लागेल. यासाठीच अर्ज तुम्ही आमच्या वेबसाइट वरून डाउनलोड करू शकता. हा अर्ज आपल्याला परिपूर्ण भरून त्यासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्र लावायची आहेत. जसे कि मुलीचा जन्माचा दाखला, बँकेचे खाते, उत्पनाचा दाखला, रेशन कार्ड इत्यादी. कागतपत्रांची संपूर्ण यादी तुम्हाला वर दिली आहे. कृपया अर्ज भारण्याअगोदर ती यादी तपासून पहा.  कुठलीही माहिती तुमच्यापासून चुकून जाऊ नये यासाठी आमची वेबसाईट lekladkiyojana.in ला भेट देत राहा तसेच या वेबसाईट च्या बेल नोटिफिकेशन्स ला subcribe करायला विसरू नका.

एकूण किती पैसे मिळणार?

या योजने अंतर्गत लाभार्थी मुलीला एकूण एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्याने भेटतील जसे
मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये
इयत्ता पाहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये
सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये
अकरावीत गेल्यावर ८ हजार रुपये
आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर एकत्रित रुपये  ७५ हजार
असे एकूण १०१०००/- रुपये अर्थसहाय्य मिळेल 

जुळ्या मुली असल्यास कोणाला मिळणार लाभ ?

या योजनेनुसार एका कुटुंबातील एकच मुलगी पात्र असणार आहे
मात्र जुळ्या मुली एकत्रित जन्मल्या असतील तर त्या दोघीनांही या योजने चा लाभ मिळणार आहे. मात्र यामध्ये एक अट आहे कि तुम्हाला दुसऱ्या मुलीला लाभ मिळून द्यायचा असेल तर तुम्हाला दुसऱ्या मुलींसाठी लेक लाडकी योजनेचा अर्ज भरताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. पहिल्या मुलीच्या वेळेस मात्र हि कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची अट शिथिल राहील. हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक असेल. भारत सरकारने तसेच महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केल्या प्रमाणे तुम्ही कुटुंब नियोजन  शस्त्रक्रिया तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन करू शकता. कारण कि छोटा परिवार सुखी परिवार. 

प्रत्यक्ष पैसे बँक खात्यात कधी पर्यंत होणार जमा?

लेक लाडकी योजने ची अंमलबजावणी करताना त्यासाठी लागणारे पैसे किंवा सरकारी भाषेत म्हणायचे झाल्यास लेक लाडकी योजना चे बजेट हे वार्षिक तत्वावर सरकार पुरवणार आहे. जसे कि सण २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी लागणारा निधी जवळपास २००० कोटी रुपये असेल आणि या रकमेची मागणी महिला व बालविकास विभागातर्फे महाराष्ट्र सरकारकडे केली असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती तटकरे यांनी दिली. सादर लेक लाडकी योजने च्या निधी ची मागणी हि सरकारकडे नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशना मधेच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. जसा महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता निधी मंजूर होऊन येईल तसे लगेच लाभार्थ्यांच्या खात्यात लेक लाडकी योजनेचा मदतीचा पहिला हप्ता हस्तांतरित केला जाईल. हा लाभ हस्तांतरित होण्यासाठी लाभार्थ्यांच्या अर्जाची, त्यांच्या कागतपत्रांची पडताळणी देखील होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या महिला व बाळ विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविकेजवळ जमा केलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात येत आहे. या पोर्टल वर जमा झालेल्या डेटा च्या आधारेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आर्थिक मदत हस्तांतरित करण्यात येईल. 

Scroll to Top